चिखली (ता. शहादा) | महाराष्ट्र शासनाच्या १० कोटी वृक्ष लागवड अभियानाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून आज दिनांक २4 सप्टेंबर २०२५ रोजी कार्यक्षेत्र पाडळदा अंतर्गत मौजे चिखली ग्रामपंचायतीत श्रमदानातून वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात चिखली गावातील ग्रामस्थ तसेच महिला शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होत पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमास मा. डॉ. मकरंद गुजर, विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण, नंदुरबार), तसेच मा. सहाय्यक वनसंरक्षक चव्हाण साहेब, वनक्षेत्रपाल श्री. रामकृष्ण लामगे उपस्थित होते. यावेळी वनपाल ईश्वर चव्हाण, अश्विनी चव्हाण, साधना वाडीले, तसेच वनरक्षक भूपेश तांबोळी, गंगोत्री गवळे आणि दिपाली पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
या अभियानात चिखली बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी –
⦁ सरवरसिंग गुलाबसिंग नाईक
⦁ संजीव सरवरसिंग नाईक
⦁ लुवारश्या जामसिंग पावरा
⦁ रेंज्या जामसिंग पावरा
⦁ इस्मल आठ्या पावरा
⦁ कोना नानश्या पावरा
⦁ कुवारशा जामसिंग पावरा
– यांच्या शेताच्या बांधावर प्रत्येकी ५० बांबू रोपांची लागवड करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ३५० बांबू रोपांचे श्रमदानातून वृक्षारोपण पार पडले.
या उपक्रमाद्वारे ग्रामस्थांनी पर्यावरण संरक्षण आणि हरित ग्रामविकासाचा संकल्प पुन्हा दृढ केला असून, ‘हरित गाव – समृद्ध भविष्यासाठी’ हा संदेश या वृक्ष लागवड उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.
#१०कोटीवृक्षलागवड#हरितगाव#पर्यावरणसंवर्धन#सामाजिकवनीकरण#nandurbar#TreePlantation#bambooplantation#SustainableFuture