Home नंदुरबार जिल्हा अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांनी 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी पूर्ण करावी

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांनी 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी पूर्ण करावी

4
Beneficiaries of Antyodaya and Pradhan Kutumb Yojana should complete e-KYC by December 31

(नंदुरबार) सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्याचे वितरण सुरळीत आणि पारदर्शक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिका लाभार्थ्यांचे ई-केवायसी (e-KYC ) करणे बंधनकारक केले असून ई-केवायसी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांनी 31 डिसेंबर 2025 पूर्वी ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

सद्यस्थिती:

जिल्ह्यातील एकूण 12,59,063 लाभार्थ्यांपैकी 9,41,390 लाभार्थ्यांचे e-KYC पूर्ण झाले असून, 3,17,673 लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण अजून बाकी आहे ई-केवायसी पूर्ण होण्याची टक्केवारी 74.77 टक्के आहे.

ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया:

• लाभार्थी रास्तभाव दुकानात ई-पॉस मशीनद्वारे मोफत e-KYC करू शकतात.

• मोबाईल अॅपद्वारे घरबसल्या e-KYC करण्यासाठी, प्रथम Google Play Store वरून “Aadhaar Face RD Service app” आणि नंतर “Mera E-KYC mobile app” इन्स्टॉल करा.

• अॅपमध्ये राज्य आणि ठिकाण निवडून, आधार क्रमांक आणि प्राप्त झालेला OTP टाका.

• माहिती सबमिट आणि व्हेरीफाय केल्यानंतर, फेस e-KYC वर क्लिक करून सेल्फी कॅमेरासमोर डोळे मिटून-उघडा, फोटो काढताच e-KYC पूर्ण होईल .

दि. 31 डिसेंबर 2025 पूर्वी जवळच्या रास्तभाव दुकानातून किंवा ‘मेरा ई-केवायसी’ (Mera E-KYC) मोबाइल अॅपद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करता येईल, असेही श्री. पवार यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.