Home महाराष्ट्र सावधान! बनावट नोटांच्या आमिषाला बळी पडू नका. महाराष्ट्र सायबरची इंस्टाग्रामवरील रॅकेटवर मोठी...

सावधान! बनावट नोटांच्या आमिषाला बळी पडू नका. महाराष्ट्र सायबरची इंस्टाग्रामवरील रॅकेटवर मोठी कारवाई!

1
Beware! Don't fall for the lure of fake notes. Maharashtra Cyber ​​takes major action against Instagram racket!

महाराष्ट्र सायबर विभागाद्वारे सोशल मीडियावरील बेकायदेशीर कृत्यांवर कडक नजर ठेवली जात आहे. नुकतेच इंस्टाग्रामवर ‘Reels’ च्या माध्यमातून बनावट भारतीय चलनी नोटा (FICN) विकणाऱ्या आणि कमी पैशात जास्त परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या खात्यांची दखल घेण्यात आली आहे.

याप्रकरणी महाराष्ट्र सायबरने मुंबई, बुलढाणा आणि जळगाव येथे एकूण ४ गुन्हे (FIRs) दाखल केले आहेत. आतापर्यंत राहुल अनिल पवार आणि योगिता हितेश भोसले या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बनावट नोटांचा वापर केवळ आर्थिक गुन्हा नसून तो देशविघातक कारवाया आणि मनी लाँड्रिंगला खतपाणी घालणारा प्रकार आहे. नागरिकांनी अशा फसव्या जाहिरातींपासून सावध राहावे आणि कोणत्याही संशयास्पद कृतीची माहिती त्वरित सायबर पोलिसांना द्यावी.

आम्ही डिजिटल जगाला सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहोत.

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. 🇮🇳