(नंदुरबार) नीती आयोग व शासन संचलित IHBAS (Institute of Human Behaviour and Allied Sciences) यांच्या सहयोगाने नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालय येथे Brain Health Clinic – मेंदू आरोग्य क्लिनिक सुरू करण्यात आले आहे.
या क्लिनिकचे उद्घाटन मा. निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती. कल्पना ठुबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे तसेच वैद्यकीय अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या क्लिनिक अंतर्गत मेंदूचा सर्वांगीण विकास, मानसिक आरोग्य संवर्धन, तसेच विविध मेंदूविषयक आजारांवर निदान, उपचार आणि थेरपी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपचार सेवा दि. २ ऑक्टोबर २०२५ पासून नागरिकांसाठी सुरू होणार आहेत.
हा प्रकल्प राज्यात फक्त नंदुरबार जिल्ह्यात आणि देशभरातील निवडक १२ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असून, याचे एकत्रित उद्घाटन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नीती आयोग श्री. B.V.R. सुब्रह्मण्यम यांच्या हस्ते VC द्वारे करण्यात आले.
या उपक्रमामुळे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच अत्याधुनिक Brain Health सेवा उपलब्ध होणार असून, मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढीस मोठी चालना मिळणार आहे.
#BrainHealthInitiative#NITIआयोग#nandurbar#BrainHealthClinic#DistrictHospital#healthcare#NandurbarUpdates