
विकसितमहाराष्ट्र २०४७ या राज्याच्या भविष्योन्मुख आराखड्यात सक्रीय सहभागी होणे हे आपले सामाजिक उत्तरदायित्व असल्याचे मत आयएसओवा (IASOWA) च्या नव-निर्वाचित अध्यक्ष अर्चना मीना यांनी व्यक्त केले.
भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आणि त्यांच्या सहचारिणींच्या संघटनेची (आयएसओवा) वार्षिक सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाली. या संघटनेतर्फे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि मनोरंजन क्षेत्रात विविध उपक्रम राबवले जातात. या सभेला माजी मुख्य सचिव तथा पूर्व अध्यक्षा सुजाता सौनिक, सचिव आर. विमला, खजिनदार झेबा नायक उपस्थित होते.















