
(शहादा) शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान टप्पा-1’ अंतर्गत शहादा येथील टाऊन हॉलमध्ये भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. मा.जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री.जयेंद्र अहिरे यांच्या सूत्रसंचालनाने झाली. तर संभाजी पाटील, तसिलदार शहादा यांनी अभियानाचा उद्देश, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती आणि अभियानाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
शिबिरात महसूल विभाग, पंचायत समिती, नगरपरिषद, महावितरण, आरोग्य विभाग तसेच विविध शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग नोंदविला. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, आधार अद्ययावत सेवा, विद्युत तक्रार निवारण, घरकुल, पाणंद रस्ते विकास योजना, मोफत वाळू योजना आदी विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांना जागेवरच देण्यात आला.
विविध विभागांच्या योजनांअंतर्गत एकूण १२४५ दाखल्यांचे वितरण करण्यात आले. नागरिकांना आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, ऑनलाइन सेवा व तक्रार निवारण यंत्रणेची माहिती देखील देण्यात आली.
यावेळी मा.जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी लाभार्थ्यांशी थेट संवाद साधत योजनांचा लाभ वेळेत व पारदर्शकपणे मिळत आहे का याची विचारपूस केली. नागरिकांच्या अडचणी तत्काळ सोडविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
“शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान व्हावे,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमास मा. उपविभागीय अधिकारी शहादा नामदेव पाटील, नगराध्यक्ष अभिजीत पाटील, पंचायत समिती अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकाच छताखाली विविध शासकीय सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. प्रशासनाच्या प्रभावी नियोजनामुळे हे अभियान यशस्वीरित्या पार पडले.
#Nandurbar#Shahada#MahasulAbhiyan#GovernmentSchemes#PublicService#DistrictAdministration#GoodGovernance#CitizenFirst#Maharashtra#लोकाभिमुखप्रशासन
See less















