
अभियानांतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरांमध्ये जनसामान्यांची महत्वपूर्ण कामे करण्यास प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यस्तरीय समितीच्या आढावा बैठकीदरम्यान दिले.
या अभियानाचा पहिला टप्पा यशस्वी झाला असून, याद्वारे लाखो नागरिकांची प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढण्यात आली आहेत. महसूल विभागाशी संबंधित लोकांची केवळ किरकोळ स्वरूपाची नव्हे तर महत्वाच्या कामांचाही प्राधान्याने निपटारा होईल यादृष्टीने शिबिरांचे नियोजन करण्याचे निर्देश मंत्री डॉ. बावनकुळे यांनी यावेळी दिले.
मंत्रालयात झालेल्या या बैठकीस राज्यमंत्री योगेश कदम, अपर मुख्य सचिव विकास खारगे, संबंधित अधिकारी आणि आमदार उपस्थित होते.
#छत्रपतीशिवाजीमहाराजराजस्वअभियान















