Home महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी #वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत आज सविस्तर चर्चा केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी #वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत आज सविस्तर चर्चा केली.

2
Chief Minister Devendra Fadnavis held detailed discussions with senior officials of #Vantara management today.

#महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप #नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले आहे, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

वनतारा व्यवस्थापनाने केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा त्यांचा कुठलाही प्रयत्न नव्हता, असे वनताराच्या अधिकाऱ्यांनी चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांना सांगितले. #कोल्हापूर

जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारीदेखील वनतारा व्यवस्थापनाने दर्शविली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.