
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. राहुल आवाडे, आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, इचलकरंजी मनपा आयुक्त पल्लवी पाटील, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर आदी उपस्थित होते.
या माध्यमातून शहरातील महानगरपालिका क्षेत्रात १० तर ग्रामीण भागात ५ विकासकामे करण्यात येणार आहेत. यामध्ये पंचगंगा प्रदूषण उपाययोजनेअंतर्गत औद्योगिक सांडपाणी प्रक्रियेसाठी (मनपा व एमआयडीसी क्षेत्र) ३६१.३१ कोटी, ग्रामीण भागात (जिल्हा परिषद) ५.७५ कोटी, तर शहरात ६२.७७ कोटी रुपयांची विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. या विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांनी रिमोटद्वारे केले. पुढील पाच वर्षांत जीएसटी परताव्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण केली असून लवकरच जीएसटीचा आवश्यक परतावा इचलकरंजीकरांना मिळेल. शहराचा विकास आणि येथील उद्योगांसाठी योग्य ती कार्यवाही करून इचलकरंजीचा चेहरामोहरा बदलू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस















