खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सर्वश्री चंद्रकांत(दादा) पाटील, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, अमित गोरखे, हेमंत रासने, शंकर जगताप, आमदार माधुरी मिसाळ, अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष कवयित्री अरुणा ढेरे, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे आदी उपस्थित होते. हा पुस्तक महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले.
‘ग्रंथांशी आपले नाते चिरकाल टिकून राहिले आहे. चारही दिशांनी येणारे ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे’. वाचन संस्कृती जपण्यासाठी शासन नेहमी पाठीशी उभे राहील.
समाजाला सृजनशील,वैचारिक ठेवण्यासोबतच सामाजिक मूल्ये जोपासण्यासाठी #वाचनसंस्कृती जीवंत ठेवणे काळाची गरज आहे. वैश्विक मराठी #अभिजात भाषा झाली, तीला राजमान्यता मिळाल्याने आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. आपण सर्वांनी मराठीच्या संवर्धनासाठी काम केले पाहिजे.
#डिजिटल युगातही आपले #ग्रंथ आणि विचार टिकून राहणार आहेत. आपली #ग्रंथसंपदा आणि विचार कधीही संपू शकत नाही. कोणतेही पुस्तक आता तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध भाषांमध्ये सहज वाचता येणे शक्य झाले आहे. आपली वाचन संस्कृती जपण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे – मुख्यमंत्री
















