
साखर गळीत हंगामात ऊस क्षेत्र, ऊस उत्पादन,ऊस उत्पादकतेच्या अचूक अंदाजासाठी एआय (AI), रिमोट सेन्सिंग (RS) व जीआयएस (GIS) चा वापर करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यानी दिल्या.
या बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.















