मुंबई: मुख्य सचिव राजेश कुमार यांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना हुतात्मा चौक येथील स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी २१ नोव्हेंबर हा दिवस ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन’ म्हणून पाळला जाताे.
यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी आँचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
















