सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार म्हणाले, ‘मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया’ या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या १२ गडकिल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक मानांकन मिळाले आहे. या किल्ल्यांसाठी स्थळ व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येत असून माहिती फलक, जनसुविधा केंद्र, माहिती केंद्र आणि पर्यटन सुविधा उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
विधानसभाकामकाज
राज्यातील पर्यटन विकासासाठी व्यापक आराखडा तयार करण्यात येत असून महाराष्ट्र चे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग करण्यावर भर दिला जाणार आहे. महाराष्ट्राला देशातील अग्रक्रमाचे पर्यटन राज्य बनवण्यासाठी ठोस पाऊले उचलली जातील, असे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभा नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना सांगितले.
सविस्तर वृत्त : https://mahasamvad.in/195331/
















