मुंबई : राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटकाळात राज्य शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना मदत व्हावी, या हेतूने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्वतःचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या वेदना आणि अडचणींची मला पूर्ण जाणीव आहे. अतिवृष्टीमुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटकाळात मदत व्हावी यासाठी, मी ऑक्टोबर महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावे असे अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांना कळविले आहे.असे सहकार मंत्री पाटील यांनी सांगितले.
















