ठिकाण: अटलबिहारी वाजपेयी सभागृह, नगर परिषद नंदुरबार
आयोजक: दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभाग, नंदुरबार नगर परिषद
दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभागांतर्गत महिलांच्या सहकारी तत्वावरील पतसंस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने लाभार्थी महिलांसाठी जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन नगर परिषद नंदुरबारच्या अटलबिहारी वाजपेयी सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे ३०० महिला उपस्थित होत्या.
प्रमुख अतिथींची उपस्थिती:
⦁ अँड. सुशील मराठे, जिल्हा न्यायालय
⦁ राहुल वाघ, प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद नंदुरबार
⦁ सुभाष मराठे, कर निरीक्षक
⦁ सुनील चौधरी व निखील देवरे – अभियान प्रतिनिधी
कार्यक्रमाचे ठळक मुद्दे:
⦁ अँड. सुशील मराठे यांनी महिलांना सहकार तत्वावरील पतसंस्थांच्या संकल्पनेबाबत मार्गदर्शन करत महिलांचे आर्थिक स्वावलंबन हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, यावर भर दिला.
⦁ मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दीनदयाल अंत्योदय योजनेची माहिती देत, या योजनेमधून महिलांनी स्वतःचा उद्योजकीय प्रवास कसा सुरू करू शकतो यावर प्रकाश टाकला.
⦁ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी मराठे यांनी तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इंदू माळी, दामिनी पवार, रविंद्र सोनवणे, माधुरी माळी, सुनिता पाटील तसेच शहरस्तर संघाचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
या जागरूकता कार्यक्रमामुळे नंदुरबार शहरातील महिलांना पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणाची दिशा मिळाली असून, स्वतःचे बचतसंघ व सहकार संस्था स्थापन करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.

#NULM#DAYNULM#WomenEmpowerment#Nandurbar#UrbanLivelihoods#SelfHelpGroups#MicroFinance#नगरपरिषद_नंदुरबार