
शहादा, वैजाली
मौजे वैजाली येथे कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी अनोख्या पद्धतीने प्रचार प्रसिद्धी रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये भजनी मंडळींनी पारंपरिक भजनाच्या माध्यमातून तर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी घोषवाक्यांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती केली.
सदर उपक्रमाचे आयोजन सहाय्यक कृषी अधिकारी श्री. योगेश मिस्त्री यांच्या सूत्रसंचालनाखाली झाले. कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका कृषी अधिकारी श्री. के. एस. वसावे यांनी केली. त्यांनी PM किसान, PMFME, गोपीनाथ मुंडे अपघात विमा, ॲग्री स्टॅक, पिक विमा, फलोत्पादन योजना, कृषी यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, महाडीबीटीवरील विविध अर्ज, तसेच अनुसूचित जाती-जमातीसाठीच्या योजना याबद्दल सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्र शाखा प्रकाशा चे शाखा व्यवस्थापक श्री. पाटील यांनी किसान क्रेडिट कार्ड विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये श्री. गिरासे तहसीलदार शहादा, श्री. एस. बी. बागुल मंडळ कृषी अधिकारी शहादा, श्री. एस. एन. पाटोळे मंडळ कृषी अधिकारी म्हसावद, श्री. ए. ए. महिरे उप कृषी अधिकारी शहादा , तसेच कृषी विभागातील सर्व अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. पंकज देसले, कृषी मित्र, भजनी मंडळ सदस्य, जि.प. शाळेतील शिक्षकवृंद, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या रॅलीमुळे गावात कृषी योजनांबद्दल जागरूकता निर्माण झाली असून शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. ग्रामस्थांनी या अभिनव उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
#वैजाली#nandurbarsmartcity#digitalfarmerid#PMFBY#AgriAwareness#कृषिकल्पना#gramawareness#smartfarmerid















