Home नंदुरबार जिल्हा नंदुरबारमध्ये पिकांवरील किड व रोग सर्वेक्षणासाठी ‘क्रॉपसॅप’ विशेष प्रशिक्षण

नंदुरबारमध्ये पिकांवरील किड व रोग सर्वेक्षणासाठी ‘क्रॉपसॅप’ विशेष प्रशिक्षण

6
cropsap-vishesha-prashikshan

नंदुरबार जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र, कोळदा येथे 6 ऑगस्ट 2025 रोजी पिकांवरील किड व रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) 2025-26 अंतर्गत विशेष सर्वेक्षणाबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

सध्या हवामान व उपग्रह माहितीच्या आधारे कीड व रोगांचा अंदाज अधिक अचूक करण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर क्षेत्रीय स्तरावर सहाय्यक कृषि अधिकाऱ्यांना कीड व रोग निरीक्षणे अचूकपणे करण्यासाठी आणि क्रॉपसॅप प्रणालीचा प्रभावी वापर करण्यासाठी हे प्रशिक्षण घेण्यात आले.

प्रशिक्षणातील मुख्य मुद्दे:

1. प्रमुख पिकांवरील कीड व रोगांची अचूक ओळख

2. आर्थिक नुकसान पातळी (ETL) समजावून घेणे

3. क्रॉपसॅप प्रणाली व मोबाईल ॲपचा पुनरावलोकन

4. क्षेत्रीय भेटीद्वारे प्रत्यक्ष निरीक्षणे व नोंदी

प्रशिक्षणासाठी मान्यवरांची उपस्थिती:

⦁ श्री. सुभाष काटकर – विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग, नाशिक

⦁ श्री. यू. बी. होले – सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, नंदुरबार

⦁ श्री. सी. के. ठाकरे – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

⦁ श्री. राजेंद्र दहातोंडे – प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, कोळदा

मार्गदर्शन सत्रातील ठळक मुद्दे:

⦁ श्री. होले सर – प्रमुख पिकांवरील कीड व रोगांची अचूक ओळख कशी करावी याचे सविस्तर मार्गदर्शन.

⦁ श्री. वाघ सर – विविध पिकांवरील रोग नियंत्रणाचे उपाय.

⦁ श्री. देशमुख सर – विविध पिकांवरील किडींच्या नियंत्रणासाठी योग्य तंत्रज्ञानाची माहिती.

⦁ श्री. करणसिंग गिरासे – मोबाईलद्वारे निरीक्षण नोंदणी करताना ‘क्रॉपसॅप’चा योग्य वापर कसा करावा हे प्रत्यक्ष दाखवून दिले.

या प्रशिक्षणामुळे जिल्ह्यातील कृषि अधिकाऱ्यांची किड व रोग ओळख, अंदाज आणि नियंत्रण याबाबतची क्षमता अधिक बळकट होणार असून शेतकऱ्यांना वेळेवर आणि अचूक सल्ला देणे सुलभ होणार आहे.

#CropSAP#NandurbarAgriculture#कृषिविज्ञानकेंद्र#किडरोगनियंत्रण#AgriTraining#FarmersFirst#nandurbarnews