Home नंदुरबार नंदुरबार सायबर सेल तर्फे सायबर जनजागृती सत्र

नंदुरबार सायबर सेल तर्फे सायबर जनजागृती सत्र

2
Cyber ​​awareness session by Nandurbar Cyber ​​Cell

तळोदा येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित नाशिक विभागीय एकदिवसीय कार्यशाळेत,

नंदुरबार सायबर सेल तर्फे सायबर जनजागृती या विषयावर माहितीपर सत्र घेण्यात आले.

या सत्राद्वारे नागरिकांना सध्यास्थितीत विविध नवनवीन पद्धतीने होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकींपासून सावध राहण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

विशेषतः खालील विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली –

1️⃣ व्हॉट्सॲपद्वारे येणाऱ्या APK फाइल्समार्फत होणाऱ्या फसवणुका

2️⃣ शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुका

3️⃣ सोशल मीडियाचा सुरक्षित वापर कसा करावा

4️⃣ डिजिटल अरेस्ट फसवणुकीचे प्रकार

5️⃣ सेक्सटॉर्शन (ऑनलाईन ब्लॅकमेलिंग) प्रकरणे

6️⃣ सायबर फसवणूक झाल्यास तक्रार नोंदविण्याची योग्य प्रक्रिया

तसेच इतर सायबर सुरक्षा संबंधित विषयांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करून सुरक्षित इंटरनेट वापराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

🔹 सायबर जागरूक नागरिक – सुरक्षित समाज, सशक्त भारत 🔹

⚠️ सायबर फसवणूक झाल्यास त्वरित संपर्क साधा —

☎️ 1930

🌐www.cybercrime.gov.in

#dgpmaharashtra

#spl_igp_nashik_range

@ShravanDathS

#CyberAwareness#CyberSafety#NandurbarPolice#CyberCell#DigitalSafety#CyberCrime#MaharashtraPolice#Taloda#CyberAlert#OnlineSafety#CyberSecurityAwareness