Home सरकारी योजना सीएसएमटीहून सुटणाऱ्या प्रत्येक रेल्वेत ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या उद्घोषणेची मागणी – राहुल...

सीएसएमटीहून सुटणाऱ्या प्रत्येक रेल्वेत ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या उद्घोषणेची मागणी – राहुल नार्वेकर

1
Demand for the slogan ‘Jai Bhavani, Jai Shivaji’ to be announced on every train departing from CSMT – Rahul Narwekar

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा उद्घोषणा करण्यात याव्यात, अशी मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दिल्ली दौऱ्यावर असताना रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेत त्यांना हे पत्र दिले.

सीएसएमटी हे मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे महत्त्वाचे केंद्र आहे. या स्थानकावरून देशाच्या विविध भागांत जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे उद्घोषणांमधून त्यांच्या कार्याचा संदेश महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदत होईल