Home महाराष्ट्र राज्यातील क्रीडा संस्कृतीच्या दर्जात्मक विकासासाठी व क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी क्रीडाविषयक...

राज्यातील क्रीडा संस्कृतीच्या दर्जात्मक विकासासाठी व क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी क्रीडाविषयक विविध बाबींचा सखोल अभ्यास करून नवीन क्रीडा धोरण तयार करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

2
Deputy Chief Minister Ajit Pawar directed that a new sports policy should be prepared by conducting an in-depth study of various aspects of sports for the qualitative development of sports culture in the state and to give a new direction to the sports sector.

क्रीडा विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भात आढावा बैठकीत कटफळ, ता.बारामती येथे प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकुलाच्या आराखड्यांचे सादरीकरण करण्यात आले.

राज्यातील सर्व क्रीडा संकुले अद्ययावत करावीत. खेळाडूंना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा, साधन-सामग्री उपलब्ध करून द्यावी आणि त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यात यावे, विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुल समितीची पुनर्रचना करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बैठकीत वेगवेगळ्या देशांमधील आणि भारतातील विविध राज्यांतील क्रीडाविषयक सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला. तसेच, सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) आणि सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) यांचा क्रीडा क्षेत्रात प्रभावी उपयोग कसा करता येईल, यावर चर्चा कर#क्रीडाधोरण

बैठकीस क्रीडामंत्री ॲड.माणिकराव कोकाटे, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) आबासाहेब नागरगोजे, वित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) श्रीमती शैला ए. आदी उपस्थित होते.

#क्रीडाधोरण