
महाराष्ट्रवासियांची एकजूट आणि निर्धाराच्या बळावर आपण आतापर्यंत राज्यावर येणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा यशस्वी मुकाबला केला आहे. महाराष्ट्राची ही एकजूट यापुढेही कायम ठेवायची आहे.
कृषी, उद्योग व्यापार, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, सामाजिक सुधारणा अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच देशात अव्वल राहिला आहे. महाराष्ट्राचे हे अव्वलस्थान कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया. शिव-शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांच्या विचारांवर सुरू असलेली वाटचाल कायम ठेवून महाराष्ट्राला, देशाला विकासाच्या दृष्टिकोनातून आणखी गतिमान करूया – उपमुख्यमंत्री श्री. पवार