
ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आता तहसील किंवा जिल्हा कार्यालयात यावे लागणार नाही. नंदुरबार जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या “ग्रामसंवाद अभियान” मुळे अधिकारी थेट गावात येणार आहेत आणि गावपातळीवरच समस्या सोडवणार आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 15 जुलै 2025 रोजी महसूल आढावा बैठकीत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
अभियानाची संकल्पना
गावपातळीवर नागरिक व प्रशासन यांच्यातील संवाद अधिक बळकट करणे त्यांच्या समस्यांसाठी तालुका किंवा जिल्हा ठिकाणी येण्याची गरज भासणार नाही, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
ग्रामीण भागातील शासकीय कार्यालये व यंत्रणा एकत्र येऊन नागरिकांच्या अडचणींचे त्वरित निराकरण करतील.
ग्रामसंवाद अभियानाची वैशिष्ट्ये
थेट गावात अधिकारी भेटी :
उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी आठवड्यातून किमान दोन दुर्गम गावांना भेट द्यायच्या आहेत.
नागरिकांच्या समस्या गावातच निकाली काढणे :
अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अडचणी गावात ऐकून घेऊन शक्य तितक्या समस्या तत्काळ सोडवाव्यात.
शासकीय यंत्रणांची पाहणी :
गावातील शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, बँका, पोस्ट ऑफिस, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी व ग्रामसेवक कार्यालय, कृषी सेवक, विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय, पतसंस्था, पशुवैद्यक अधिकारी इत्यादी ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली जाईल.
दर महिन्याला आढावा :
अभियानाचा दर महिन्याला महसूल आढावा बैठकीत सादर केला जाईल.
डॉ.मित्ताली सेठी यांचे प्रतिपादन
“ग्रामसंवाद अभियानामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या गावपातळीवरच सोडवता येतील. यामुळे त्यांचा वेळ, खर्च वाचेल आणि प्रशासनावरचा विश्वास वाढेल. हे अभियान प्रशासनाला अधिक लोकाभिमुख बनवेल.”
उपस्थित मान्यवर
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी
अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे
निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे
सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नांवदर, अंजली शर्मा, के.के. कनवरीया
परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी शिवांश सिंह
कार्यकारी अभियंता सा.बा. विभाग अंकुश पालवे
सर्व तहसीलदार,
जिल्हा परिषद अधिकारी
या अभियानामुळे काय बदल होणार?
नागरिकांची कामे गावातच पूर्ण होणार
कार्यालयांमध्ये होणारी वारंवार धावपळ टळणार
वेळ व खर्च वाचणार
प्रशासनावरचा विश्वास वाढणार

#ग्रामसंवादअभियान#Nandurbar#LokabhimukhPrashasan#CitizenCentricGovernance#डॉमित्तालीसेठी