Home शेती हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी उद्योजकतेची दिशा — नव-तेजस्विनी कार्यक्रमांतर्गत मशरूम शेती प्रशिक्षण...

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी उद्योजकतेची दिशा — नव-तेजस्विनी कार्यक्रमांतर्गत मशरूम शेती प्रशिक्षण यशस्वी!

2
Direction of entrepreneurship for women in the wake of climate change — Mushroom farming training under Nav-Tejaswini program successful!

महिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) नव-तेजस्विनी कार्यक्रमांतर्गत हवामान बदलाच्या दुष्परिणामांवर मात करत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.

🔹 स्थळ: देवमोगरा नगर पुनर्वसन, वाण्याविहीर, ता. अक्कलकुवा

🔹 ३ दिवसीय प्रशिक्षण

🔹 सहभाग: ३५ महिला बचत गट सदस्य

हवामान बदल, उपजीविकेचा मार्ग आणि मशरूम शेतीचा नवा पर्याय:

अल्पभूधारक व भूमिहीन महिलांच्या उपजीविकेच्या समस्येवर उपाय म्हणून कमी जागा, कमी श्रम, कमी भांडवली गुंतवणूक व अधिक उत्पन्न देणारी मशरूम शेती ही एक पर्याय म्हणून महिलांसमोर मांडण्यात आली.

यासाठी माविम अंतर्गत चेतना लोक संचलित साधन केंद्र वाण्याविहीर मार्फत देवमोगरा येथे तीन दिवसीय मशरूम शेती व वातावरण बदल यावरील प्रशिक्षण घेण्यात आले.

मार्गदर्शन आणि प्रशिक्षण:

⦁ मशरूम शेतीचे तांत्रिक मार्गदर्शन राजेंद्र वसावे व लीलाताई वसावे यांनी केले.

⦁ वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी, माविम नंदुरबार यांनी हवामान बदल आणि GTM (Gender Transformative Mechanism) संदर्भात महिलांना उपजीविकेच्या नव्या संधीबाबत मार्गदर्शन केले.

⦁ श्री. प.सी. कुंदे व श्री. यु.डी. पाटील (सेच कृषी विज्ञान केंद्र) यांनी मशरूम लागवडीच्या वैज्ञानिक व प्रत्यक्ष प्रक्रियेची माहिती दिली.

⦁ श्री. गी.म. चौधरी (जिल्हा उद्योग केंद्र) यांनी CMEGP व PMEGP योजनांची माहिती देत महिलांना सूक्ष्म उद्योजकता संधींबाबत सजग केले.

प्रशिक्षणाचा समारोप:

⦁ प्रशिक्षणाच्या अंतिम दिवशी प्रत्येक सहभागी महिलेस मशरूम लागवड कीट व अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले.

⦁ हा उपक्रम नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना हवामान स्नेही शेती व स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी नवसंजीवनी ठरत आहे.

⦁ महिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार यांच्या पुढाकाराने ग्रामीण महिलांना नव्या अर्थव्यवस्थेची दिशा देणारा हा प्रशिक्षण उपक्रम निश्चितच स्तुत्य आणि अनुकरणीय ठरतो.

Mavim Nandurbar

#Tejaswini#MAVIM#WomenEmpowerment#MushroomFarming#ClimateAction#RuralEntrepreneurship#Nandurbar#GTM#SustainableFarming#महिला_सक्षमीकरण