(नवापूर) रंगावली मध्यम प्रकल्प (ता. नवापूर, जि. नंदुरबार) पूर्ण क्षमतेने भरला असून पावसामुळे पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सध्या धरणाची पाणी पातळी 227.00 मीटर वर पोहोचली असून प्रकल्प 100% क्षमतेने भरला आहे. त्यामुळे आज सकाळपासून धरणाच्या सांडव्यावरून 15,915 क्युसेक विसर्ग सुरू आहे.
प्रशासनाचा इशारा:
रंगावली नदीकाठच्या या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे-
उन्बर्डी, खर्बर्डी, प्रतापपूर, चौकी, बोकळझर, रायपूर, धनराट, नांदवन, विजापूर, मोरथवा, वाग्ळापाडा आणि नवापूर – नदीपात्रात गुरेढोरे किंवा मनुष्य न पाठविण्याचे तसेच आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
स्थितीचा आढावा:
⦁ खोकसा परिसरात: रात्री 3 वाजल्यापासून मुसळधार पाऊस झाला, सकाळी 6 वाजल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला.
⦁ चौकी–रायपूर पूल: पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
⦁ नागझरी पूल: पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.
नागरिकांना आवाहन:
कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे व सहाय्यक अभियंता श्रेणी-1, पाटबंधारे उपविभाग, नंदुरबार यांच्या वतीने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे, नदीकाठाजवळ जाणे टाळण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#Nandurbar#FloodAlert#RangawaliDam#DisasterManagement#Navapur#StaySafe#HeavyRain#NarmadaBasin