Home शेती “सत्यमेव जयते फार्मर कप 2024” मध्ये नंदुरबार जिल्ह्याचा झेंडा उंचावणाऱ्या शेतकरी गटांचा...

“सत्यमेव जयते फार्मर कप 2024” मध्ये नंदुरबार जिल्ह्याचा झेंडा उंचावणाऱ्या शेतकरी गटांचा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते गौरव!

2
District Collector Dr. Mittali Sethi felicitated the farmer groups who raised the flag of Nandurbar district in the “Satyamev Jayate Farmer Cup 2024”!

संघटन, सेंद्रिय शेती आणि जिद्दीच्या बळावर मिळवलेलं यश!

पाणी फाउंडेशन आयोजित राज्यव्यापी स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी गटांनी आपल्या कर्तृत्वातून तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत जिल्ह्याचा गौरव वाढवला.

🏆 ५०,०००/- रुपये रोख व सन्मानचिन्ह प्राप्त गट:

➡️ जागृती महिला शेतकरी गट (गणोर, ता. शहादा)

➡️ शिवशक्ती शाश्वत कृषक मंडळ (घोटाणे, ता. नंदुरबार)

✨ २५,०००/- रुपये रोख व सन्मानचिन्ह प्राप्त गट:

➡️ जीवनधारा महिला शेतकरी गट (मानमोड्या)

➡️ कुंड माऊली शेतकरी गट (पिंपराणी)

➡️ शिवशक्ती शेतकरी गट (वासदरे)

➡️ छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी गट (ढेकवद)

सन्मान समारंभाच्या प्रमुख पाहुण्या जिल्हाधिकारी. डॉ. मित्ताली सेठी

यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले,

🗣️ “एखादं काम का होत नाही हे समजून घेणं गरजेचं आहे.

मी स्वतः फील्डवर जाऊन शेतकरी गटांची कामं पाहणार आहे.

आपल्याकडे असलेल्या संसाधनांचा वापर करून जागतिक ओळख कशी निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न करा. आणि यापुढील वाटचाल शेतकरी उत्पादक कंपनी (एफ.पी.सी.) कडे व्हायला हवी. प्रशासन त्यासाठी पूर्ण पाठिंबा देईल.”

समारंभास उपस्थित मान्यवर…

✔️ श्री. दीपक पटेल –प्रकल्प संचालक, “आत्मा” (शेती तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा)

✔️ सौ. बनकर वरिष्ठ जिल्हा समन्वयक, माविम (माहिती व महिला सक्षमीकरण अभियान)

✔️ श्री. दहातोंडे कृषी विज्ञान केंद्र (कोळदा)

✔️ अजय जाधव – तालुका अभियान व्यवस्थापक, उमेद अभियान

✔️ जितेंद्र सोनवणे, जिल्हा व्यवस्थापक, विकसन व शाश्वतता संस्था

✔️ जयश्री सपकाळे जिल्हा समन्वयक, मुलांसाठी युवक विकास संस्था

✔️ गुणवंत पाटील, विभागीय समन्वयक, पाणी फाउंडेशन

✔️ गोपाल पाटील, श्री. भूषण ठाकरे, श्री. प्रणय गोरीवले, श्री. अविनाश काळे

… व जिल्ह्यातील विविध गावांतील अनेक शेतकरी स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेतील ठळक वैशिष्ट्ये:

✅ ४३६० शेतकरी गटांचा सहभाग. नंदुरबार जिल्ह्यातून २०१ गट सहभागी

✅ १२५ हून अधिक कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

✅ डिजिटल शेती शाळांमधून आधुनिक शेतीचे शिक्षण

✅ नैसर्गिक कीड व्यवस्थापन: निंबोळी अर्क, दशपर्णी, बायोमिक्स, विविध सापळ्यांचा प्रभावी वापर

✅ अडजी-पडजी (इर्जिक) पद्धतीने शेतात परस्पर मदत-मजुरीवरील खर्चात मोठी बचत

✅ सामाजिक उपक्रम: ग्रामस्वच्छता, रोपांची लागवड, पावसाच्या नोंदी, आंतरगट सहकार्य

महिला नेतृत्व, शाश्वत शेती आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम या यशामागे आहे!

या गटांनी नंदुरबार जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

सर्व विजयी गटांचे हार्दिक अभिनंदन!

शेतकऱ्यांच्या मेहनतीला आणि एकतेला मानाचा मुजरा!

#SatyamevJayateFarmerCup2024

#NandurbarShines

#MahilaShakti

#ShetiSamrudhi

#NaturalFarming

#FPCWaatchaal

#PaniFoundation

#ShashwatSheti

#TeamworkSuccess

#शेतकरीगौरव

#नंदुरबारचा_अभिमान

#जगाला_दाखवू_शेतीची_शक्ती