Home नंदुरबार जिल्हा जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची जवाहर नवोदय विद्यालय श्रावणी ता.जि.नंदुरबार येथे भेट

जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची जवाहर नवोदय विद्यालय श्रावणी ता.जि.नंदुरबार येथे भेट

1
District Collector Dr. Mittali Sethi visits Jawahar Navodaya Vidyalaya Shravani, Taluka Nandurbar

मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जवाहर नवोदय विद्यालय, श्रवणी येथे भेट देऊन जवाहर नवोदय विद्यालय नंदुरबार–१, नंदुरबार–२ तसेच ईएमआरएस विद्यालय, डोंगसांगडी यांची Vidyalaya Management Committee (VMC) व Vidyalaya Advisory Committee (VAC) यांची संयुक्त बैठक आयोजित केली.

या बैठकीत सर्व संबंधित विद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी तसेच VMC/VAC सदस्य उपस्थित होते.

बैठकीपूर्वी मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नव्याने सुसज्ज संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच त्यांनी विद्यालयातील खगोलशास्त्र प्रयोगशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या खगोल विषयक प्रकल्प व उपक्रमांची माहिती घेतली.

ज.नि.वि. नंदुरबार–२ चे प्राचार्य श्री. पी. आर. कोसे यांनी मा. जिल्हाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर विद्यालयाच्या कार्यप्रणालीचा आढावा सादर करण्यात आला.

बैठकीदरम्यान मा. जिल्हाधिकारी यांनी सर्व सदस्यांचे अभिप्राय व समस्या अत्यंत बारकाईने ऐकून घेतल्या. विशेषतः विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती, पायाभूत सुविधा, पिण्याचे पाणी, वसतिगृह व्यवस्थापन, शिक्षकांची कमतरता आदी विषयांवर चर्चा झाली.

मा. जिल्हाधिकारी यांनी विद्यालयांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच त्यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.

बैठकीच्या शेवटी आभार प्रदर्शनानंतर बैठक यशस्वीपणे संपन्न झाली.

#नंदुरबार#जिल्हाधिकारी#डॉमित्तालीसेठी#JNV#EMRS#शिक्षणविकास#VMC#VAC#जवाहरनवोदयविद्यालय#DigitalEducation