तळोदा तालुका
आज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी प्रशासनातील अधिकारी व ‘फीडिंग इंडिया’ या अशासकीय संस्थेच्या टीमसोबत अतिदुर्गम ओडिबारी व मोठीबारी पाड्यांना भेट दिली.
बालविकासावर भर…
ओडिबारी येथील अंगणवाडी पुढील 1 महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ग्रामसेवकांना देण्यात आल्या.
गर्भवती व स्तनदा मातांशी संवाद, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन उपाययोजनांबाबत चर्चा केली.
अर्धा तास पायपीट करून पोहोचले जिल्हाधिकारी!
रस्ता नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अर्धा तास पायी चालत पाड्यावर पोहोचून स्थानिक ग्रामस्थ व अंगणवाडीतील महिलांसोबत संवाद साधला.
हे होते दौऱ्यात उपस्थित…
जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड
बालविकास प्रकल्प अधिकारी (तळोदा) सागर वाघ
विस्तार अधिकारी, (तळोदा)हाबेल गावीत
फिडींग इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित सिंग, कार्यकारी अधिकारी, पवनकुमार पाटील
नीती आयोगाच्या ब्लॉक फेलो वैष्णवी रामडोहकर
दुर्गम भागात विकास व सुविधा पोहोचवण्यासाठी प्रशासनाच्या संकल्पनेतून एक महत्त्वपूर्ण पाऊल!

#गावांचा_विकास#दुर्गमभागातील_सेवा#नंदुरबार#FeedingIndia#WomenEmpowerment#Anganwadi#TribalWelfare#Jilhaadhikari#DevelopmentForAll