Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 4 सप्टेंबर रोजी आयोजन | Nandurbar

नंदुरबार येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 4 सप्टेंबर रोजी आयोजन | Nandurbar

44
Nandurbar Democracy Day
Nandurbar Democracy Day

(नंदुरबार) जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सप्टेंबर महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार 4 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. (Nandurbar News) ही माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

लोकशाही दिन (Democracy Day)

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे वगळून तक्रार अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे उपस्थित राहून सादर करावेत, असेही आवाहन प्रसिध्दी पत्रकान्वये श्री. खांदे यांनी केले आहे. (Nandurbar News)

#nandurbar #nandurbarnews #nandurbardistrict #आदिवासी #नंदुरबार_जिल्हा #नंदुरबार

Nandurbar