Home नंदुरबार जिल्हा 6 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

6 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

0
District Level Democracy Day on April 6th

(नंदुरबार) जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींचे तत्परतेने निवारण करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सोमवार, दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात दुपारी 1:00 वाजता जिल्हास्तरीय ‘लोकशाही दिना’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

शासकीय यंत्रणेकडून सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना न्याय मिळावा यासाठी तालुका, जिल्हा, विभाग आणि मंत्रालय स्तरावर लोकशाही दिन राबविले जातात. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार, जिल्ह्यातील जनतेसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो.

तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया:

• तालुकास्तर: नागरिकांनी आपल्या वैयक्तिक तक्रारी किंवा निवेदने प्रथम तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या लोकशाही दिनात सादर करणे आवश्यक आहे. हा दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केला जातो .

• जिल्हास्तर: जर तालुकास्तरीय लोकशाही दिनातील निर्णयावर समाधान झाले नसेल, तर जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार किंवा निवेदन सादर करावे.

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.