#नंदुरबार, भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (DARPG) यांच्या पुढाकाराने 19 डिसेंबर, 2024 ते 24 डिसेंबर, 2024 या कालावधीत “सुशासन सप्ताह-प्रशासन गाव की ओर” मोहिमेसाठी आठवडाभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
त्यासाठी आज शासनाच्या निर्देशानुसार रंगावली सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी, सावन कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी, हरिष भामरे, उपजिल्हाधिकारी (महसू- प्रशासन) गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेश चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार श्री. कोल्हे, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. दिपक चव्हाण, तसेच आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, प्रकल्प कार्यालय आदिवासी विकास विभाग तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
०००००००००००
















