जिल्ह्यातील युवक, महिला व नवउद्योजकांना उद्योग–व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला District YESummit – 2, Nandurbar हा तीन दिवसीय जिल्हास्तरीय उद्योजकता महोत्सव २२, २३ व २४ डिसेंबर २०२५ रोजी नंदुरबार येथे यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमाला जिल्हा प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले.
या YESummit चे आयोजन Development Support Center, MAVIM, KVK नंदुरबार, ASK Foundation, Youthaid Foundation, Youth Entrepreneur Federation India (YEFI), CYDA तसेच Telangana Government Industrial Corporation (TGIC) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
तीन दिवस चाललेल्या या उपक्रमास जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ३०० हून अधिक युवक, महिला व नवउद्योजकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून विविध सत्रांचा लाभ घेतला. कार्यक्रमात उद्योजकतेविषयी मार्गदर्शन सत्रे, Buyer–Seller Meet, तसेच Business Pitching Competition यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्य मार्गदर्शक म्हणून मा. चेतन गिरीसे (मॅनेजर, AAZOL Ventures, मुंबई) यांनी उपस्थित उद्योजकांना व्यवसाय वाढ, ब्रँडिंग, जाहिरात, मार्केटिंग तसेच गुंतवणूक संधी याविषयी सखोल माहिती दिली.
Business Pitching Competition साठी ज्यूरी म्हणून मा. एन. पी. पाटील (व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र – DIC),आरती देशमुख (KVK), लाभदा पाटील व श्रीलक्ष्मी पिल्लई (Oxypro Labs Pvt. Ltd.), वैष्णवी रामदोहकर (NITI Aayog), प्रज्ञा राहसे (Rahase Expex Pvt. Ltd.) यांच्यासह जिल्हा व राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी उद्योजक विनोद पाटील, मयुरी चौधरी, आशा पाटील, मंजुषा चौधरी, आशा वळवी, किरण वळवी, ज्योती वळवी व रमिला पाडवी उपस्थित होते.
स्पर्धेत वैभव विजयसिंग रघुवंशी यांनी प्रथम क्रमांक पटकावत ‘जिल्हा उत्कृष्ट उद्योजक’ हा बहुमान मिळवला. सूर्यदर्शन एफपीओ, धडगाव यांनी द्वितीय, तर राजेंद्र वसावे (अक्कलकुवा) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. यासोबतच अश्विनी मोरे, मयुरी निकुंभे, जिरुबाई वसावे, विलास वळवी, रामकृष्ण पटेल, मंगला चौधरी व मोनाक्षी श्रॉफ यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष गौरविण्यात आले.
या स्पर्धेतून निवड करण्यात आलेल्या सर्वोत्तम पाच उद्योजकांना फेब्रुवारी २०२६ मध्ये हैद्राबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील YESummit मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
या YESummit च्या यशस्वी आयोजनासाठी Dr. शांताराम बडगुजर (Secretary, CYDA) व जयश्री सापकाळे (Project Manager, CYDA, नंदुरबार) यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. शिवाजी परमार (Youthaid Foundation) व सौ. आरती देशमुख (कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार) यांनी केले.
या उपक्रमामुळे नंदुरबार जिल्ह्यातील नवउद्योजकांना मार्गदर्शन, नेटवर्किंग, बाजारपेठेशी थेट जोड तसेच राष्ट्रीय पातळीवरील संधी उपलब्ध झाल्या, असे मत उपस्थित मान्यवर व आयोजकांनी व्यक्त केले.
(Collector Office Nandurbar)
#YESummitNandurbar#YouthEntrepreneurs#WomenEntrepreneurs#StartupEcosystem
















