
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना (PMKKKY) अंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठान, नंदुरबार (District Mineral Foundation – DMF) नियामक परिषद व व्यवस्थापकीय समितीची बैठक आज मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे पार पडली.
या बैठकीस मा. आमदार श्री. आमश्या पाडवी (अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ), मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल, उपजिल्हाधिकारी (महसूल), जिल्हा खनिकर्म अधिकारी, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला. त्यांनी शैक्षणिक सुविधा सुधारणा हा एक महत्त्वाचा प्राधान्यक्रम ठरवत, जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये वर्गखोली बांधकाम, शाळा दुरुस्ती आणि मूलभूत सुविधा उभारणीची कामे तातडीने हाती घेण्याचे निर्देश दिले.
बैठकीत खनिज क्षेत्राशी संबंधित सामाजिक कल्याणाच्या उपाययोजनांवर सखोल चर्चा झाली. जिल्ह्यातील खनिज महसूलातून मिळणारा निधी शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण या क्षेत्रात वापरून शाश्वत विकासाच्या दिशेने ठोस पाऊले उचलावीत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.
ही बैठक जिल्ह्यातील खनिज क्षेत्राचा सर्वांगीण व लोककल्याणकारी विकास साधण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना नवे बळ देणारी ठरली.
#नंदुरबार#डॉमित्तालीसेठी#प्रधानमंत्रीखनिजक्षेत्रकल्याणयोजना#DistrictMineralFoundation#DMFNandurbar#SustainableDevelopment#EducationInfrastructure#RuralDevelopment#GoodGovernance#SmartNandurbar#InclusiveGrowth#TeamNandurbar#PrashasanAplyaDarbarat#NandurbarUpdates