नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल आजाराच्या नियंत्रणासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून जिल्हा सिकलसेल आजार नियंत्रण कक्ष (कॉल सेंटर) याचे उद्घाटन शनिवार, दि. 04 ऑक्टोबर 2025 रोजी राज्याचे क्रिडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात आले.
या प्रसंगी मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे आणि मा. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी कोकणी यांच्या उपस्थितीत जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे नियंत्रण कक्षाचे प्रत्यक्ष उद्घाटन पार पडले.
उद्घाटनानंतर मा. जिल्हाधिकारी यांनी स्वतः सिकलसेल रुग्णांशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली तसेच आवश्यक त्या सल्ल्या व सूचना दिल्या. यामुळे सिकलसेल रुग्णांशी थेट संवाद साधून त्यांच्या आरोग्य सेवांमध्ये सातत्य व वेग आणणे शक्य होणार आहे.
या कार्यक्रमाला पाथ संस्थेचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. मधुर संत, सिकलसेल समन्वयक राहुल सोनवणे, राकेश सैंदाणे, नीलम साळवे, सिकलसेल समुपदेशक दीपक धनगर आणि सिकलसेल टेक्निशियन कुवरसिंग वसावे उपस्थित होते.
जिल्हा सिकलसेल आजार नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक:
02564-299274
02564-299291
हा नियंत्रण कक्ष सिकलसेल रुग्णांच्या आरोग्यसेवा, सल्लामसलत, औषधोपचार आणि नियमित तपासणीसाठी थेट संपर्काचे माध्यम ठरेल. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने घेतलेली ही पुढाकार सिकलसेल आजाराविरुद्ध लढ्यात एक महत्त्वाचे शस्त्र ठरणार आहे.
#SickleCellAwareness#Nandurbar#Healthcare#PublicHealth#SickleCellControl#DistrictAdministration#जनआरोग्य#SickleCellFreeNandurbar