दिनांक ११ जुलै २०२५ रोजी मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांनी तालुका अक्कलकुवा, धडगाव व मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयांना भेट देऊन विविध सुविधा व समस्या यांचा आढावा घेतला.
रुग्णालय, जमाना (ता. अक्कलकुवा)
सिव्हिल सर्जन डॉ. सोनवणे यांनी ग्रामीण रुग्णालय जमाना येथे भेट देऊन जुन्या व नव्या इमारतीसह निवासी वसाहत व प्रसूती कक्षाची पाहणी केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंकर वळवी व इतर कर्मचार्यांशी संवाद साधून रुग्णसेवेत येणाऱ्या अडचणी व पाणीपुरवठा, वीज व मूलभूत सुविधांबाबत माहिती घेतली.
ग्रामीण रुग्णालय, मोलगी
सदर भेटीत रुग्णालयातील रुग्णकक्ष, जिने व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रवेशद्वारावर चॅनेल गेट बसवणे, सुरू असलेल्या बांधकामे पूर्ण करणे व X-ray मशीन दुरुस्तीचे आदेश दिले. तसेच, कर्मचार्यांच्या अतिदुर्गम सेवा बजावणाऱ्या योगदानाचे कौतुक करत प्रोत्साहन भत्त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती दिली.
ग्रामीण रुग्णालय, धडगाव
धडगाव रुग्णालयात ४० बेडची नवीन इमारत व कर्मचार्यांची वसाहत या ठिकाणी स्थळ पाहणी करण्यात आली. ओपीडी, जनरल विभाग, ऑपरेशन थिएटर, औषध साठा, NRC व CSSD विभागाची पाहणी करून दर्जेदार सेवा टिकवण्यावर भर दिला. १०२ व १०८ रुग्णवाहिकेसंदर्भात माहिती घेऊन रुग्ण फेरासाठी तत्काळ सुविधा देण्याचे निर्देश दिले. ऑफिससाठी लवकरच क्लार्क नेमणुकीचे आश्वासन दिले.
उपस्थित अधिकारी:
डॉ. नरेश पाडवी (अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक), डॉ. प्रीती पटले (वैद्यकीय अधीक्षक, मोलगी), डॉ. शंकर वळवी (वैद्यकीय अधीक्षक, जमाना), व सर्व कर्मचारीवर्ग.
डॉ. सोनवणे यांनी स्पष्ट केले की, ग्रामीण व अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असून दर महिन्याला अशा भेटी घेऊन यंत्रणेला अधिक गतिमान केले जाईल.

#DistrictSurgeonVisit#NandurbarHealth#GraminRugnalay#HealthcareInspection
#Jamana#Molgi#Dhadgaon#HealthInfrastructure
















