नंदुरबार जिल्ह्यातील आर्थिक विकास आणि विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समिती (DLCC) बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीस मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी (भा.प्र.से.) तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल (भा.प्र.से.) उपस्थित राहून जिल्ह्यातील आर्थिक उपक्रमांचे पुनरावलोकन केले व पुढील कार्ययोजना निश्चित केली.
मा. जिल्हाधिकारी व सीईओ यांचे मार्गदर्शक निर्देश:
बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले की, “जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याने आर्थिक समावेशनाच्या उद्दिष्टांकडे वेगाने वाटचाल करणे आवश्यक आहे.” त्यांनी विविध योजनांच्या प्रगतीबाबत पुढीलप्रमाणे निर्देश दिले –
केसीसी टार्गेट पूर्णत्वासाठी कॅम्पचे आयोजन:
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून प्रत्येक तालुक्यात किसान क्रेडिट कार्ड (KCC) कॅम्पचे आयोजन करून जिल्ह्याचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश दिले.
प्राणीसंवर्धन व मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढा:
KCC अंतर्गत Animal Husbandry आणि Fisheries विभागातील पेंडिंग प्रकरणे लवकरात लवकर सोडवावीत, असे निर्देश देण्यात आले.
PMEGP, CMEGP आणि PMFME योजनांची प्रगती गतीमान करा:
या योजनांअंतर्गत बँक शाखांमध्ये प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढून जिल्ह्याचे टार्गेट पूर्ण करावे, असे सांगण्यात आले.
नवीन शाखा सुरू करण्यास गती:
DFs आणि SLBC यांनी दिलेल्या टार्गेटनुसार नंदुरबार जिल्ह्यात नवीन बँक शाखा उघडण्याच्या प्रक्रिया गतीने पार पाडाव्यात. यासाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, जिल्हा समन्वयक आणि संबंधित विभागांनी दर आठवड्याला रिव्ह्यू मीटिंग घेण्याचे आदेश दिले.
बैठकीस उपस्थित मान्यवर:
⦁ श्री. विशाल गोंडके, लीड डिस्ट्रिक्ट ऑफिसर, आरबीआय
⦁ श्री. रवींद्र मोरे, डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर, नाबार्ड
⦁ श्री. नंदकुमार पैठणकर, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक
⦁ श्री. गिरीश (इन्स्पेक्टर), जिल्हा उद्योग केंद्र
⦁ PMFME जिल्हा नोडल ऑफिसर, कृषी विभाग
⦁ सर्व महामंडळांचे प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक
या बैठकीतून जिल्ह्यातील बँकिंग सेवा, शासकीय योजनांचा लाभ, आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण यांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.
#DLCCMeeting#Nandurbar#DistrictAdministration#KCCCamp#PMEGP#CMEGP#PMFME#FinancialInclusion#NABARD
















