Home शैक्षणिक डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीरण योजना; मुंबई उपनगर जिल्ह्यातील संस्थाना १४ नोव्हेंबरपर्यंत...

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीरण योजना; मुंबई उपनगर जिल्ह्यातील संस्थाना १४ नोव्हेंबरपर्यंत अर्जाची मुदत

11
Dr. Zakir Hussain Madrasa Modernization Scheme; Applications for institutions in Mumbai Suburban Districts till November 14

मुंबई : अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीरण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अनुदानासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील संस्थांनी १४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी संजयकुमार शिंदे यांनी केले आहे.

योजनेचा लाभ राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या मदरशांना दिला जाणार आहे. ज्या मदरशांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या केंद्र सरकारच्या योजनांतर्गत लाभ मिळाला आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अधिक माहितीसाठी 022 69403370/19 या क्रमांकावर संपर्क साधावा.