Home अक्कलकुवा अक्कलकुवा येथे ‘स्वप्नातील गाव’ प्रकल्पाचा शुभारंभ – स्वदेस फाउंडेशनचा उपक्रम

अक्कलकुवा येथे ‘स्वप्नातील गाव’ प्रकल्पाचा शुभारंभ – स्वदेस फाउंडेशनचा उपक्रम

3
‘Dream Village’ project launched at Akkalkuwa – an initiative of Swades Foundation

अक्कलकुवा (जि. नंदुरबार)

नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण सक्षमीकरणाला नवे परिमाण देण्यासाठी स्वदेस फाउंडेशनच्या ‘स्वप्नातील गाव’ प्रकल्पाचा शुभारंभ अक्कलकुवा तालुक्यात झाला. हा उपक्रम मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते पार पडला.

या प्रसंगी मा. आमदार आमश्या दादा पाडवी, मा.जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. शशांक काळे उपस्थित होते.

ग्रामीण विकासासाठी नवीन दिशा

स्वदेस फाउंडेशनने यापूर्वी नाशिक व रायगड जिल्ह्यातील २५० हून अधिक गावे स्वच्छ, सुंदर, स्वस्थ, सक्षम व आत्मनिर्भर या ध्येयांवर आधारित ‘स्वप्नातील गावे’ म्हणून विकसित केली आहेत. त्या अनुभवावर आधारित आता अक्कलकुवा तालुक्यातही हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग…

आदिवासी विकास विभागाचे सचिव श्री. विजय वाघमारे व स्वदेस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मंगेश वांगे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग नोंदवला. श्री. वाघमारे यांनी शासन, ग्रामस्थ व फाउंडेशनच्या सहकार्याने अनेक गावे आदर्शरूप होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

प्रकल्पाची संकल्पना व मार्गदर्शन…

• श्री. मंगेश वांगे व सौ. नीता हरमलकर यांनी प्रकल्पाचे उद्दिष्ट स्पष्ट केले.

• आमदार श्री. पाडवी व सीईओ श्री. गोयल यांनी शुभेच्छा दिल्या.

• मुख्यमंत्री फेलो साक्षी देऊळवार यांनी गाव भेटीतील अनुभव मांडला.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन…

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगत सर्व शासकीय अधिकारी, सरपंच व ग्रामसेवकांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन केले.

मान्यवरांची उपस्थिती…

कार्यक्रमास तहसीलदार श्री. विनायक घुमरे, स्वदेस फाउंडेशनचे वरिष्ठ संचालक श्री. राहुल कटारिया, श्री. रणजीश कट्टडी, डॉ. सुरेंद्र यादव, प्रकल्प व्यवस्थापक श्री. दीपक गिऱ्हे, श्री. विलास पावरा, श्री. भुषण बूनकर तसेच ग्रामसेवक, सरपंच, सामाजिक संस्था व आकांक्षित तालुका समन्वयक श्री. विशाल बेद्रे उपस्थित होते.

सुत्रसंचालन व आभार…

कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन श्री. तुषार इनामदार यांनी केले, तर आभारप्रदर्शन गटविकास अधिकारी श्री. लालू पावरा यांनी मानले.

👉 या प्रकल्पामुळे अक्कलकुवा तालुक्यातील गावे सर्वसमावेशक व आत्मनिर्भर विकासाच्या दिशेने वाटचाल करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Swades Foundation @swadesfound#Nandurbar#SwadesFoundation #SwapnatilGaav