नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि Eklavya India Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एकलव्य करिअर मार्गदर्शन मेळावा’ या विशेष उपक्रमाचा शुभारंभ आज उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याचा उद्देश ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, शिष्यवृत्ती आणि करिअरच्या विविध संधींबाबत सखोल मार्गदर्शन करणे हा आहे.
कार्यक्रमात GTP College, MKD College, Samaj Kalyan Junior College तसेच जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील ११वी व १२वीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यांना १२वी नंतर त्यांच्या आवडीनुसार आणि stream नुसार करिअर निवडीचे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी भूषविले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत संधींचा योग्य वापर करून समाजाचे उन्नयन करण्याचे आवाहन केले. डॉ. श्री. चंद्रकांत पवार (प्रकल्प अधिकारी, ITDP नंदुरबार) यांनी विद्यार्थ्यांना उद्दिष्ट निश्चित करून सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश दिला.
Eklavya India Foundation चे संस्थापक आणि Chevening Scholar श्री. राजू केंद्रे तसेच स्नेहल माळी यांनी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक मार्ग, विदेशी अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती आणि नवीनतम UG कोर्सेसबद्दल सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह टिकून राहावा यासाठी विविध संवादात्मक उपक्रम आणि प्रेरणादायी सत्रेही आयोजित करण्यात आली.
यासोबतच ‘एकलव्य फाउंडेशन’च्या माध्यमातून यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगून उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरित केले. सुभाष कासदेकर यांनी शिक्षणाने आयुष्यात कसा बदल घडवला जाऊ शकतो, यावर आपला जीवनानुभव शेअर केला.
हा उपक्रम विशेषतः आदिवासी विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आणि गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर केंद्रित आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास – आत्मविश्वास, संवाद कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता आणि डिजिटल शिक्षण – यावर भर दिला जातो. ITDP नंदुरबार सोबत भागीदारीत या कार्यक्रमाद्वारे आदिवासी आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना ब्रिज कोर्सेस, डिजिटल शिक्षण, शिष्यवृत्ती मार्गदर्शन आणि वैयक्तिक विकासाच्या संधी दिल्या जातात.
या कार्यक्रमास किरण मोरे (APO, ITDP नंदुरबार), UNDP LDN नंदुरबार चे स्वप्निल धायकर, उषा वसावे (Collector Office Nandurbar), मानसी एंडोले (CM Fellow), अभिनव कोळे (CM Fellow), वैष्णवी रामडोहकर (नीती आयोग फेलो), ललिता मावसकर (Eklavya Anandghar Fellow), गणेश सुरपम (TISS), स्नेहा भानरकर (TISS) आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालनाची जबाबदारी साक्षी देऊळवार (CM Fellow) यांनी उत्कृष्टपणे पार पाडली.
‘एकलव्य करिअर मार्गदर्शन मेळावा’ — प्रत्येक विद्यार्थ्यासाठी यशाची नवी दिशा आणि प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात!
#EklavyaCareerGuidanceMela#Nandurbar#EklavyaIndiaFoundation#CareerGuidance#EduBridgeProgram#DrMitaliSethi#ITDPNandurbar#StudentEmpowerment#TribalEducation#SkillDevelopment#YouthForChange
















