Home शैक्षणिक ‘एकलव्य करिअर मार्गदर्शन’ उपक्रम — आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, संधी आणि प्रेरणेचा प्रकाश

‘एकलव्य करिअर मार्गदर्शन’ उपक्रम — आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, संधी आणि प्रेरणेचा प्रकाश

2
‘Eklavya Career Guidance’ initiative — a beacon of education, opportunity and inspiration for tribal students

नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि Eklavya India Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘एकलव्य करिअर मार्गदर्शन’ या विशेष उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध आश्रम शाळा आणि वसतिगृहांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना करिअरविषयक सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमाअंतर्गत Chevening Scholar आणि Eklavya India Foundation चे संस्थापक श्री. राजू केंद्रे व स्नेहल माळी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत देश-विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती योजना, स्पर्धा परीक्षा, आधुनिक UG कोर्सेस, डिजिटल स्किल्स याबद्दल माहिती दिली. तसेच डॉ. श्री. चंद्रकांत पवार (प्रकल्प अधिकारी, ITDP नंदुरबार) यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

📍 भेटींचा तपशील:

🔹 दिनांक 7 नोव्हेंबर

ढोंगसागळी आश्रम शाळा, नंदुरबार येथे सुमारे इयत्ता ११वी आणि १२वी (५० विद्यार्थी) उपस्थित होते. या सत्रात विद्यार्थ्यांना करिअर निवडीची दिशा, शैक्षणिक संधी आणि स्कॉलरशिपविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

🔹 दिनांक 8 नोव्हेंबर

आदिवासी मुलींचे वसतिगृह, नंदुरबार येथे ११वी, १२वी आणि पदवीचे (२२० मुली) विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थिनींसाठी विशेषतः विदेशी शिक्षण, इंग्रजी प्रावीण्य, आत्मविश्वास वाढविणे, तसेच नवीनतम UG कोर्सेस यावर माहिती दिली.

🔹 दिनांक 9 नोव्हेंबर

समाजकल्याण मुलांचे वसतिगृह येथे नंदुरबार ११वी, १२वी व पदवी (३५ विद्यार्थी) उपस्थित होते. समाजकल्याण मुलींचे वसतिगृह नंदुरबार, येथे ५० विद्यार्थिनीना शिष्यवृत्ती मार्गदर्शन, प्रवेश प्रक्रिया, कौशल्यविकास आणि स्पर्धा परीक्षा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

🔹 दिनांक 10 नोव्हेंबर

तालांबा आश्रम शाळा व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल, अक्कलकुवामधील ९वी ते १२वी (२०० विद्यार्थी ) येथे विद्यार्थ्यांना करिअर रोडमॅप, शिक्षणातील नव्या संधी, डिजिटल शिक्षण कौशल्ये यावर सविस्तर माहिती देण्यात आली.

उपक्रमाचा मुख्य उद्देश

ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांना —

✔ उच्च शिक्षणाच्या संधींची माहिती

✔ विविध करिअर मार्गांची ओळख

✔ भारतीय व विदेशी अभ्यासक्रमांचे मार्गदर्शन

✔ शिष्यवृत्ती व हॉस्टेल सुविधा

✔ जीवनकौशल्ये, संवादकौशल्ये व डिजिटल लर्निंग

यांची सखोल माहिती देऊन त्यांच्या भविष्यासाठी स्पष्ट दिशा निर्माण करणे.

या मार्गदर्शन भेटींसाठी साक्षी देऊळवार (CM Fellow), मानसी एंडोले (CM Fellow), अभिनव कोल्हे (CM Fellow), वैष्णवी रामडोहकर (NITI Aayog Fellow) आदी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्तम शिक्षण, करिअर नियोजन आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे. ‘एकलव्य करिअर मार्गदर्शन’ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या घडणीत एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.