Home महाराष्ट्र हमीभावाने भरडधान्य खरेदीस 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ ;जिल्हा पणन अधिकारी आर.एस. इंगळे...

हमीभावाने भरडधान्य खरेदीस 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ ;जिल्हा पणन अधिकारी आर.एस. इंगळे यांची माहिती

2
Extension of purchase of coarse grains at guaranteed price till 31st December; District Marketing Officer R.S. Ingle's information

खरीप हंगाम 2024-25 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावाने राज्यात भरडधान्य (ज्वारी, मका, बाजरी व रागी) खरेदीसाठी BeAM पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने शेतकरी नोंदणीसाठी शासनाकडुन 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे, अशी माहिती एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये जिल्हा पणन अधिकारी आर.एस. इंगळे यांनी दिली आहे.

खरीप हंगाम 2024-25 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावाने राज्यात भरडधान्य (ज्वारी, मका, बाजरी व रागी) खरेदी करीता BeAM पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने शेतकरी नोंदणी करीता 15 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. परंतु या कालावधीत शेतकरी नोंदणी झालेली नसल्यामुळे शासनाकडुन 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

सर्व शेतकरी बांधवाना आवाहन करण्यात येते की, दिलेल्या खरेदी केंद्रावर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करुन या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असेही या प्रसिद्धि पत्रकात जिल्हा पणन अधिकारी आर.एस. इंगळे नमूद केले आहे.

👇ही आहेत खरेदी केंद्रे…

🌾शेतकरी सहकारी संघ लि. नंदुरबार । मोबाईल क्रमांक 9763286860

🌾शहादा ता. सहकारी खरेदी विक्री संघ लि. शहादा । मोबाईल क्रमांक 7722014165

००००००००००