(मोड) तळोदा तालुक्यातील तळवे येथे ग्राम पंचायत तर्फे आरोग्य उपकेंद्राला आय ड्रॉप वाटप करण्यात आले. ( Eye drop distribution to talve public health center)
ग्रामीण भागात डोळे येण्याचे प्रमाण वाढले
संपुर्ण जिल्हाभरात डोळे येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वातावरणाच्या बदलाचा परिणाम डोळ्यांवर होत असल्याने शहरी भागासह ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर डोळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे तळोदा तालुक्यातील तळवे गावात देखील डोळ्यांची साथ येऊन ती वाढू नये म्हणून ग्राम पंचायत तळवे मार्फत प्रार्थमिक आरोग्य उपकेंद्राला आय ड्रॉप भेट म्हणून देण्यात आले आहे. बाधित रुग्णाला आय ड्रॉप देऊन आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी लोकनियुक्त सरपंच मोग्या कृष्णा भिल, ग्रामपंचायत सदस्य ताराचंद शिंदे, मनोज ठाकरे, महेंद्र पाटील ग्रामसेवक एम.के. बकाम तसेच आरोग्य सेवक एस. बी. जाधव, नर्स एन.जे.पाडवी, आर.के.पाडवी, आशा सेविका पुष्पा सिताराम पाटील इत्यादी उपस्थित होते.