तळोदा तालुक्यातील मौजे सरदारनगर येथे कृषी विभागाच्या वतीने प्रगतशील शेतकरी श्री. मान्या गुंजाऱ्या पावरा यांच्या शेतावर ‘पिकावरील किड व रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प योजना २०२५’ अंतर्गत कापूस पिकाची शेतीशाळा २६ ऑगस्ट २०२५ रोजी घेण्यात आली.
शेतीशाळेची सुरुवात शेतकरी प्रतिज्ञेने झाली. त्यानंतर शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध प्रयोग, प्रात्यक्षिके व मार्गदर्शन सत्रे घेण्यात आली.
लघु अभ्यास:
⦁ श्रीमती स्वाती गावीत (सहाय्यक कृषी अधिकारी) यांनी मित्र किडी व शत्रू किडींची ओळख पोस्टर चित्रीकरणाद्वारे शेतकऱ्यांना करून दिली.
⦁ श्री. गणेश सोनवणे (उप कृषी अधिकारी) यांनी ढालकिडा (LBB), क्रायसोपा या किडींबाबत तसेच विविध रोग व त्यांचे व्यवस्थापन याबाबत माहिती दिली.
विशेष विषय:
मा. तालुका कृषी अधिकारी श्रीमती मीनाक्षी वळवी यांनी माँ रेवा शेतकरी गटातील शेतकऱ्यांना कामगंध व पिवळे चिकट सापळ्यांचे प्रात्यक्षिक करून त्यांचे महत्त्व व उपयोग स्पष्ट केले.
लघु प्रयोग:
श्री. विलास निकुम (मंडळ कृषी अधिकारी) यांनी पिक परिसंस्था निरीक्षण (CESA) तसेच रसशोषक किडी – मावा, तुडतुडे, फुलकिडी यांचे प्रक्षेत्रावर निरीक्षण कसे नोंदवावे याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन दिले.
शेतीशाळेनंतर अल्पोपहार व सांघिक खेळ आयोजित करण्यात आले. महिलांनी उत्साहाने सहभाग घेत मित्रकिडी प्रत्यक्ष शोधून दाखविल्या. विशेषतः ढालकिडा हातावर घेऊन आनंदाने सर्वांसमोर सादर केल्याने शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला.
मान्या पावरा, गुला पावरा, रमेश पावरा, सुकलाल पावरा, उषाताई पावरा, रायकी पावरा, राधाबाई पावरा तसेच कृषी सखी व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#nandurbar#taloda#KrishiVibhag#shetishala#CottonCropCare#FarmersFirst#agricultureawareness