Home शेती महिला शेतकरी गटाची कृषी विज्ञान केंद्र, कोळदा येथे प्रक्षेत्र भेट

महिला शेतकरी गटाची कृषी विज्ञान केंद्र, कोळदा येथे प्रक्षेत्र भेट

4
Field visit of women farmers group at Agricultural Science Center, Kolda

महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या किड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत मौजे मानमोडे येथे सुरू असलेल्या कापूस पिकाच्या महिला शेतीशाळेचा चौथा वर्ग दि. 10 सप्टेंबर रोजी संपन्न झाला.

या निमित्ताने सहाय्यक कृषी अधिकारी अर्जुन पावरा यांच्या नियोजनानुसार महिला शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र, कोळदा येथे प्रक्षेत्र भेट आयोजित करण्यात आली.

प्रगत तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन:

या भेटीदरम्यान कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ दुर्गाप्रसाद पाटील व सहाय्यक संदीप कुवर यांनी महिला शेतकऱ्यांना कापूस उत्पादनातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली.

अभ्यासलेले तंत्रज्ञान –

1️⃣ दादालाड कापूस लागवड व उत्पादन तंत्रज्ञान

2️⃣ कापूस पिकाचे खत नियोजन

3️⃣ गुलाबी बोंडअळीची ओळख व नियंत्रण (कामगंध सापळ्यांचा वापर)

4️⃣ रसशोषक किडींचे नियंत्रण (चिकट सापळ्यांचा वापर)

5️⃣ फुलगळ नियंत्रणासाठी उपाययोजना

शेतीशाळेतील उपक्रम:

🔹 वर्गाची सुरुवात शेतीशाळा प्रतिज्ञेने करण्यात आली.

🔹 मागील वर्गातील विषयांचा आढावा घेऊन नवीन विषय शिकविण्यात आला.

🔹 महिला शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेत कापूस पिकाची निरीक्षणे करून नोंदी सादर केल्या.

🔹 लघू व विशेष अभ्यास गट तयार करण्यात आले.

🔹 ‘वन मिनिट शो’ या सामूहिक खेळात महिला शेतकऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

🔹 शेवटी मनोगत सादर करून वर्गाचा समारोप झाला.

आयोजनाचे यश:

या प्रक्षेत्र भेटीसाठी तालुका कृषी अधिकारी काशीराम वसावे व मंडळ कृषी अधिकारी मनोज खैरनार यांचे मार्गदर्शन लाभले. संपूर्ण उपक्रमाचे यशस्वी आयोजन सहाय्यक कृषी अधिकारी अर्जुन पावरा यांनी केले.

महिला शेतकरी गटासाठी ही प्रक्षेत्र भेट प्रेरणादायी ठरली असून आधुनिक कृषी तंत्रज्ञानामुळे उत्पादनवाढीसोबतच कीड व रोग व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

#Nandurbar#Kolada#KrushiVigyanKendra#WomenFarmers#CottonCrop#CropSap#ShetiShala#Agriculture#FarmerTraining#कृषीविज्ञानकेंद्र#शेतीशाळा