धानोरा (ता. अक्कलकुवा), ग्रामीण भागातील आरोग्य सेवांमध्ये एक ऐतिहासिक टप्पा पार करत ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथे पहिल्यांदाच सिझेरियन सेक्शन (Cesarean Section) शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे.
ही शस्त्रक्रिया मा. डॉ. विनय सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. डॉ. नरेश पाडवी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक आणि डॉ. प्रीती पटले, वैद्यकीय अधीक्षक यांच्या प्रेरणेने राबविण्यात आली.
सदर शस्त्रक्रिया डॉ. श्वेता जिंदे, स्त्रीरोगतज्ञ यांनी कौशल्यपूर्वक पार पाडली. त्यांच्या पाठीशी डॉ. किरण जगदेव, भूलतज्ञ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याशिवाय श्रीमती दिनू वळवी (इंचार्ज सिस्टर), श्रीमती शुभांगी बाविस्कर (स्टाफ नर्स) आणि श्री जगदीश चौधरी यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.
या शस्त्रक्रियेस प्राथमिक आरोग्य केंद्र नटावाद येथील आशा ताई व आशा सुपरवायझर देखील उपस्थित होत्या.
ही यशस्वी शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालय धानोरा येथील वैद्यकीय सेवांचा आत्मविश्वास वाढवणारी ठरली आहे. या उपक्रमामुळे दूरवरून मोठ्या रुग्णालयात जावे लागणाऱ्या महिलांना आता स्थानिक पातळीवरच सुरक्षित आणि दर्जेदार उपचार उपलब्ध होणार आहेत.
आरोग्य यंत्रणेच्या सर्व घटकांचे यासाठी अभिनंदन!
#धानोरा#ग्रामीणआरोग्य#सिझेरियनशस्त्रक्रिया#DistrictHospitalSuccess#HealthForAllAges#nandurbarsmartcity