जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी आणि स्थलांतरितांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी शोध मोहिम राबवणे, यांचा डेटा तयार करणे, त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्याच्या सूचना आज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी प्रशासकीय यंत्रणाना दिल्या आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्यासह उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेश चौधरी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कृष्णा राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
००००००००००
