Home तळोदा वनसंपदा पोर्टल प्रशिक्षण — सामुहिक वनहक्क व्यवस्थापनात डिजिटल परिवर्तनाची नवी दिशा

वनसंपदा पोर्टल प्रशिक्षण — सामुहिक वनहक्क व्यवस्थापनात डिजिटल परिवर्तनाची नवी दिशा

3
Forest Resources Portal Training — A new direction for digital transformation in collective forest rights management

(तळोदा) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा येथे सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांसाठी ‘वनसंपदा’ या नव्याने विकसित डिजिटल पोर्टलवर सर्वसमावेशक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मा. अनय नावंदर (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली हे प्रशिक्षण मार्गदर्शनात्मक आणि माहितीपूर्ण सत्र म्हणून पार पडले.

डिजिटल व्यवस्थापनाची मोठी पायरी:

‘वनसंपदा’ पोर्टल हे सामुहिक वनहक्क (CFR) व्यवस्थापनासाठी विकसित केलेले एकात्मिक डिजिटल साधन असून त्याद्वारे-

1. सामुहिक वनहक्कांची माहिती डिजिटल स्वरूपात एकत्रित करणे

2. गावातील सुरु असलेल्या व प्रस्तावित कामांची माहिती सिस्टीममध्ये नोंदवणे

3. CFR (Community Forest Rights) क्षेत्रांचे डिजिटल सीमांकन

4. समित्यांच्या कारभारात पारदर्शकता व सुलभता आणणे

या सर्व प्रक्रियेची ऑनलाइन नोंद ठेवता येणार आहे. जिल्ह्यात प्रथमच सर्व सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांचे पोर्टल लॉगिन तयार करून त्यांना पोर्टलचा वापर कसा करायचा, डेटा एंट्री व अपडेट कसे करायचे याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षणातील प्रमुख मुद्दे:

1. गावाची प्राथमिक माहिती पोर्टलवर अपलोड करण्याची पद्धत

2. गावात सुरु असलेल्या कामांची माहिती, अहवाल व प्रस्ताव तयार करणे

3. प्रस्तावित कामांचे डिजिटल सबमिशन

4. CFR क्षेत्रांचे सीमांकन (Mapping)

5. समितीची रचना, सदस्यांची माहिती व कार्यपद्धती डिजिटल करणे

तळोदा तालुक्यात मान्य असलेल्या 20 सामुहिक वनहक्क गावांच्या सर्व समित्या प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी उपस्थित होत्या.

मनरेगा व सर्वेक्षण कार्याला गती:

समित्यांना सूचित करण्यात आले की —

⦁ वैयक्तिक वनहक्क धारकांच्या सर्वेला गती द्यावी, ज्यासाठी गावातील मोबिलायझर कार्यरत आहे.

⦁ CFR गावांमध्ये मनरेगा अंतर्गत तातडीने कामांचे प्रस्ताव व ग्रामसभा ठराव सादर करावेत.

⦁ ग्रामसभा व इतर सामुहिक उपक्रमांत CFR हक्क, व्यवस्थापन व शासन योजनांविषयी अधिकाधिक जागृती करावी.

प्रशिक्षणासाठी उपस्थित मान्यवर:

या प्रशिक्षण सत्राला सहायक प्रकल्प अधिकारी देवेंद्र वाणी, प्रकल्प समन्वयक अमोल राठोड, कनिष्ठ लिपिक तुषार झुर्वे, वेकलोक कंपनीचे नंदलाल निकवाडे, तसेच सर्व सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समित्या उपस्थित होत्या.

हे प्रशिक्षण सामुहिक वनहक्क व्यवस्थापनात डिजिटल पारदर्शकता, वेग आणि जबाबदारी वाढविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.

#CFR#DigitalNandurbar