रक्तक्षयमुक्त भारताच्या दिशेने ठोस पाऊल!
रक्तक्षय (ऍनिमिया) रोखण्यासाठी भारत सरकारने गुणसंवर्धित तांदूळ (Fortified Rice) वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नंदुरबार जिल्ह्यात तालुका पातळीवर प्रशिक्षण सत्र सुरू!
नंदुरबार तहसील कार्यालयात आयोजित पहिल्या प्रशिक्षण सत्रात,
मास्टर्स ट्रेनर्स – श्री. विठ्ठल काकडे, श्री. सचिन शिंदे व श्री. हितेश ढाले यांनी उपस्थितांना सखोल माहिती दिली.
प्रशिक्षणातील महत्त्वाचे मुद्दे:
तांदळात मिसळलेले लोह, फॉलिक आम्ल आणि व्हिटॅमिन B-12 चे आरोग्यासाठी फायदे.
रक्तक्षय व कुपोषण निर्मूलनासाठी फोर्टीफाईड राईसचे महत्त्व.
देशाच्या सर्वांगीण विकासावर याचा सकारात्मक प्रभाव.
प्रशिक्षणादरम्यान पॉवर पॉईंट सादरीकरण आणि माहितीपट दाखवण्यात आला.
प्रशिक्षण साहित्य WhatsApp आणि जिल्हाधिकारी/जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या फेसबुक पेजवर उपलब्ध करून देण्यात आले.
रेशन दुकानदार, अंगणवाडी कर्मचारी आणि आश्रमशाळांचे प्रतिनिधी यांचा उत्स्फूर्त सहभाग!
प्रशिक्षणार्थींनी आश्वासन दिले की, ते ही माहिती समाजातील इतरांपर्यंत पोहोचवतील आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतील!
#सुदृढभारत#गुणसंवर्धिततांदूळ#रक्तक्षयमुक्तभारत#फोर्टीफाईडराईस#Nandurbar#PoshanAbhiyan