
त्यात नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांचाही सहभाग होता. या विद्यार्थ्यांनी प्रथमच रेल्वे प्रवास, विमान प्रवास आणि दिल्ली दर्शन केले. नंदुरबार प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी महामहीम राष्ट्रपती यांना एक चित्रकृती भेट दिली. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्य यांची देखील भेट घेतली. या विद्यार्थ्यांचे या जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी कौतुकासह अभिनंदन केले आहे.
००००००००००















