
(नंदुरबार)
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत महिला रुग्णालय नंदुरबार येथील डी.ई.आय.सी केंद्रामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 18 जुलै रोजी 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांसाठी मोफत 2D-Echo हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर शिबीराचे आयोजन ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम नंदुरबार’ व ‘बालाजी हॉस्पिटल भायखळा, मुंबई’ यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. डॉ. नरेश पाडवी यांच्या हस्ते संपन्न झाले.
या शिबिरात 145 बालकांची हृदय तपासणी करण्यात आली, त्यापैकी 25 बालकांमध्ये हृदयसंबंधी व्याधी आढळून आल्या असून, त्यांना पुढील मोफत तपासणी, उपचार व शस्त्रक्रियेसाठी बालाजी हॉस्पिटल (भायखळा), तसेच शासनाशी सामंजस्य करार असलेल्या इतर नामांकित रुग्णालयांमध्ये (जसे की फोर्टिस, कोकिळाबेन अंबानी, रहेजा, अपोलो, ज्युपिटर हॉस्पिटल) पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक श्री. मनोहर ढीवरे यांनी दिली.
शिबिरात सहभागी मान्यवर आणि तज्ञांची उपस्थिती:
या शिबिरात बालहृदय तज्ञ डॉ. श्रीपाल जैन (बालाजी हॉस्पिटल) यांनी प्रमुख तपासणी केली. त्यांच्यासोबत प्रतीक मिश्रा यांच्यासह संपूर्ण टीमने सहभाग घेतला.
या प्रसंगी डॉ. विनय सोनवणे (जिल्हा शल्य चिकित्सक), डॉ. कपिल दुसेजा, डॉ. सुजाता दहिवेलकर, डॉ. चेतना चौधरी, डॉ. सोनल भावसार, डॉ. योगेंद्र पाडवी, डॉ. जितेंद्र भंडारी, डॉ. एंजल वसावे, शुश्मा बिरारे, भाग्यश्री पगारे यांच्यासह RBSK आणि DEIC चे अधिकारी, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.
तपासणी शिबिरामागील उद्देश:
डॉ. विनय सोनवणे यांनी सांगितले की, नंदुरबार हा आकांक्षित जिल्हा असल्यामुळे जिल्ह्यात कुपोषण व बालरोगांचे प्रमाण अधिक आहे. यासाठी आरोग्य तपासणी पथकांद्वारे अंगणवाडी व शाळांमध्ये नियमित आरोग्य तपासणी केली जाते. बालकांमध्ये हृदयाची धडधड अनियमित असणे, दूध पिताना घाम येणे, ओठ निळसर पडणे, श्वास घ्यायला त्रास होणे यांसारखी लक्षणे दिसल्यास पालकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथके व जिल्हा पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे त्यांनी केले आहे.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष योगदान: या उपक्रमाच्या यशामध्ये RBSK वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, DEIC पथक, व जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक श्री. मनोहर ढीवरे, यांच्यासह सर्वांच्या मेहनतीचा मोलाचा वाटा राहिला.
#RBSK#HeartHealthForChildren#नंदुरबार#बालहृदयरोग_तपासणी#DEIC#राष्ट्रीयआरोग्यअभियान#बालाजीहॉस्पिटल#Free2DEchoCamp#ChildHealthMatters#NandurbarDistrict