(अक्कलकुवा) जामिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी केलेली आहे. (Get benefit of Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana)
पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना (Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana)
निवेदनात नमूद केले आहे की,आम्ही विद्यार्थी जामिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिक्षण घेणारे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात ऑनलाईन अर्ज भरला होता. आमचे महाविद्यालय प्रथम बीएड वर्ष फेब्रुवारी ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत सुरू होते. या शैक्षणिक वर्षात माहे फेब्रुवारी ते मे २०२२ पर्यंत विद्यार्थ्यांना आजतागायत लाभ मिळालेला नाही.
आमदार आमश्या पाडवी यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी
द्वितीय वर्ष बीएड सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात सुद्धा ऑनलाईन अर्ज भरलेला आहे. आमचे वर्ष महाविद्यालय २०२२ पासुन आजतागायत सुरू आहे. तरी या चालु शैक्षणिक वर्षात माहे २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे व शैक्षणिक वर्ष वाढल्यामुळे माहे मार्च पासुन ते आजतागायत लाभ मिळालेला नाही. तरी महाविद्यालयाची परीक्षा ही विद्यापीठाकडून मिळालेल्या वेळापत्रकानुसार माहे ऑगस्ट २०२३ अखेरपर्यंत आहे. तरी महाशयांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेचा लाभ मिळवून द्यावा,ही नम्र विनंती विद्यार्थ्यांनी आमदार आमश्या पाडवी यांच्याकडे केलेली आहे. निवेदनावर सर्व अनुसूचित जमातीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत.